राज्य सरकारने रेशन दुकानदारांना बायोमेट्रिक सिस्टम केल्यापासून आता त्यांना हा व्यवसाय फार परवडत नाही. पूर्वी रेशनला माल आला तर आला, नाही तर गेला अशी अवस्था असायची. मात्र सरकारने रेशन दुकानांमध्ये पारदर्शकता आणलेली आहे. शिधा वाटपावेळी असलेल्या कमतरता शोधून त्यावर उपाय केले आहेत. गरजूंना अन्नधान्य मिळावे ही यामगची भूमिका असल्याचं उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी व्यक्त केली. पुण्यातील चाकण औद्योगिक क्षेत्रातील म्हाळुंगे परिसरात भारतातील पहिले पूर्णवेळ सौर उर्जेवर चालणारे कोल्डलॉक या शीतगृहाचे उद्घाटन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते<br />#AjitPawar #NCP #SakalMedia #Politics #MarathiNews #LatestMarathiNews #LiveMarathiNews<br />Please Like and Subscribe for More Videos.